Nawab Malik | ‘शरद पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील’ – नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | ‘शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असलेला पक्ष असल्याची जोरदार टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 

नवाब मलिक म्हणाले, ”देवेंद्र फडणवीस यांना याआधीही शरद पवार यांनी कात्रजचा घाट दाखवला होता, आताही ते बोलत राहिले तर, पवार त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत,” असा थेट इशारा नवाब मलिकांनी (Nawab Malik) दिला आहे. तसेच पुढे मलिक म्हणाले, ”शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणूनही निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात 25 ते 30 जागा निवडून येत होत्या, ते आता पवार यांच्याबाबत भाष्य करत आहेत. याअगोदरही पवार यांच्यावर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले?” असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले फडणवीस?
पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’.
ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात. त्याच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही.
नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रा पुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, अस फडणवीस यांनी म्हटले होते.


Web Title :-  
Nawab Malik | ncp nawab malik targets bjp devendra fadnavis after criticizes over ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘खाचखळग्यांचा’ त्रासाची डेडलाईन 10 फेब्रुवारीपर्यंत; 20 जानेवारीची डेडलाईन हुकली

 

Corporator Vasant More | खासदार निधीतून बसविलेली 15 टॉयलेटस् बंद अवस्थेत; उभारण्यासाठी केलेला 2 कोटींचा खर्च संबधित लोकप्रतिनिधींकडून वसुल करावा – मनसेची मागणी

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात 3959 नवीन रुग्णांचे निदान, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी