Nawab Malik Net Worth | ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik Net Worth | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सक्तवसुली संचालनानयानं (ED) अटक (Arrest) केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार (Financial Transaction) केल्याचा आरोपाखाली त्यांना अटक करण्याची माहिती समोर आली आहे. नबाव मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबतची (Nawab Malik Net Worth) चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियातही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

 

नवाब मलिक यांनी 2009 च्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती (Nawab Malik Net Worth) पुढीलप्रमाणे…

 

– 2019 च्या प्रतिपत्रानुसार त्यांच्याकडे 4 लाख 54 हजार रुपये रोख (Cash) असल्याचे म्हटलं होतं.
तसेच त्यांच्या पत्नीकडे 97,232 रुपये रोख आहेत. बँकेतील जमा रकमेबाबत बोलायचं झालं तर मलिक यांचा बँक बॅलन्स (Bank Balance) 5 लाख 3 रुपये आहे.
तर पत्नीच्या खात्यात 1 लाख 92 हजार रुपये असल्याचे नमूद केलं होतं.

 

– नवाब मलिक यांच्याकडे 35,231 रुपयांचे गुंतवणूक रोखे (Investment Securities) आणि पत्नीच्या नावे 1 कोटी 13 लाख रुपयांचे रोखे आहेत.
तसेच 5 लाखांची एलआयसी (LIC) आहे.

 

– मलिक यांच्यावर 15 लाख 16 हजार 233 रुपये कर्ज (Loan) असून त्यांच्याकडे 7 लाख रुपयांची वाहने आणि पत्नीकडे 4 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
त्यांच्या पत्नीकडे 32 लाख 43 हजार रुपयांची संपत्ती आहे.
अशा स्थितीत मलिक यांच्याकडे 37 लाख 7 हजार रुपयांची तर पत्नीकडे 1 कोटी 53 लाख रुपयांची संपत्ती आहे.

 

– घर जमीन बाबत बोलायचे झाले तर मलिक यांच्याकडे 1 कोटी 14 लाख रुपये आहेत.
तर पत्नीकडे 2 कोटी 70 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

 

– नवाब मलिक यांच्यावर 19 लाख 49 हजार तर पत्नीवर 25 लाख 81 हजार रुपये कर्ज आहे.

कमाई किती?
प्रतिज्ञापत्रानुसार, 2018-19 मध्ये त्यांनी 10 लाख 90 हजार रुपये कमावले होते.
यापूर्वी 2017-18 मध्ये 11 लाख 83 हजार, 2016-17 मध्ये 2 लाख 3 हजार, 2015-16 मध्ये 6 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

 

Web Title :- Nawab Malik Net Worth | nawab malik net worth know property details of ncp leader and maharastra minister who has been arrested by ed in money laundring case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! ईपीएफ क्लेमसाठी ई-नॉमिनेशनचे बंधन संपले

 

Kiara Advani Viral Photo | कियाराचे साडीतील फोटो पुन्हा एकदा चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..

 

Nawab Malik In ED Custody | नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका! सत्र न्यायालयाने मलिकांना सुनावली 9 दिवसांची ईडी कस्टडी