भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी पैसे खाल्ल्याचं ‘सिध्द’ करू, राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकावरून आता नवा वाद सुरू झाला असून हिवाळी अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत सांगितले कि, ‘शिवस्मारकासंदर्भात कनिष्ठ अधिकार्यांनी वर्क ऑर्डर दिले होते, मात्र वरिष्ठ अधिकारी वर्क ऑर्डर द्यायला तयार नव्हते. तसेच कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाला आहे, हा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित करणार आहे. आम्ही काम थांबवणार नाहीत पण भ्रष्टाचार झालाय तो उघड करू, मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे हे समोर आणले आहे, तसेच चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचं सिद्ध करून दाखवू असेही मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले.

अरबी समुद्रातील शिवस्मारक ही राज्यातील जनतेची अनेक वर्षांची इच्छा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परवानग्या आणून कामाला सुरुवात केली. जी काँग्रेस-राष्ट्रवादीला १५ वर्षांच्या काळात एकही परवानगी आणता आली नाही. हीच गोष्ट या नव्या महाविकासआघाडीला खटकत आहे. त्यामुळे शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसेच शिवस्मारक प्रकल्पाचे १०० कोटींचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. मग आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा काय होऊ शकतो, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/