Nawab Malik | ‘पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’ ! आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिकांचे जोरदार प्रत्युत्तर; दिला ‘हा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पब (Pubs), पार्टी आणि पेंग्विनमुळे (Penguin) महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra government) केली होती. शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पब, पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता, पार्टीत कोण असंत, पबला कोण असतं, हे आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असे प्रत्युत्तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शेलार यांना दिले आहे.

 

ठाकरे सरकारच्या (Thackeray government) दोन वर्षांच्या कामगिरीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. नवाब मलिक यांनी शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधाला आहे. दोन वर्षाच्या काळात सरकार अनेक समस्यांना तोंड देत सरकार इथपर्यंत पोहोचलं. कोविड काळात राज्य सरकारने केंद्रापेक्षाही चांगलं काम केलं. तिथ मृतदेह नदीत वाहत होते, पण इथे आम्ही रुग्णांना वाऱ्यावर सोडले नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

 

सरकार पडेल असे बोलून भाजप थकलं

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील दोन वर्षे सरकार पडेल असं बोलून भाजप थकलं आहे. आता त्यांच्याकडे बोलायला काही राहीलं नाही, असा टोला मलिक यांनी शेलार यांना लगावला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन कुणालाही सरकार स्थापन करता येत नाही. हे भाजपला आतापर्यंत कळायला पाहिजे होते. आम्ही ठाम आहोत सरकार चालेल, आणि काहीही झालं तरी पडणार नाही, असं मलिक यांनी ठणकावून सांगितले.

 

Web Title : Nawab Malik | ‘Pub, party and penguin bring Maharashtra into disrepute’! ncp minister Nawab Malik’s strong response to bjp leader Ashish Shelar’s criticism; Given a ‘yes’ warning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | ‘हे’ कागदपत्र जमा केले नाही तर पुढील महिन्यापासून PF ‘कटिंग’ होईल बंद, ‘या’ पध्दतीनं टाळा असुविधा

Sanjay Raut | संगीत सोहळयात वधूपिता संजय राऊतांचा सुप्रिय सुळेंसोबत ‘डान्स’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

Best Pension Plan Retirement Scheme | दरमहा मिळेल 9 लाख रुपयांची पेन्शन ! तात्काळ सुरू करा गुंतवणूक, जाणून घ्या ‘प्लान’