Nawab Malik | ED च्या ‘त्या’ छापेमारीवरून नवाब मलिकांचा खुलासा; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या (Maharashtra Waqf Board) कथित जमीन प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) पुण्यामध्ये (Pune) जवळपास 7 ठिकाणी आज (गुरूवारी) धाड टाकली आहे. यामध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर कारवाई केल्याचे वृत्त पसरले होते. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तातडीने खुलासा केला. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापा पडलेला नसल्याचं मलिक यांनी सांगितलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, वक्फ बोर्डाचे काम पारदर्शकपणे सुरू आहे. बोर्डातील सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलीय. असे नमूद करतानाच वक्फ बोर्डाकडे तीस हजार संस्थांची नोंद असून त्याची चौकशी करायची असल्यास ED ने ती करावी, असं मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच, ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहचले असे सांगितले जात आहे, पण मी ईडीला घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले तर त्यांचे स्वागतच आहे. असे ते म्हणाले.

पुढे मलिक पुण्यातील कारवाईबाबत म्हणाले, ही कारवाई ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टशी (Coffin Reward Endowment Trust) संबंधित प्रकरणात झाली आहे.
इम्तियाज हुसेन शेख आणि इतर ट्रस्टींनी बनावट दस्तावेजाच्या आधारे पैसे हडप केले असून याबाबत वक्फ बोर्डाच्या तक्रारीवरून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात 13 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी चाँद रमजान मुलानी, इम्तियाज मोहम्मद हुसेन शेख, कलिम सय्यद व अन्य 2 जणांना अटक केलीय.
याच प्रकरणात ईडीने (ED) आज छापेमारी केली आहे. असं मलिक म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र वक्फ बोर्ड अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारित येतो.
त्यामुळेच पुण्यातील सक्तवसुली संचालनालयाची (ED) छापेमारी समोर आल्यानंतर मलिक यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होत होती.
मात्र, नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
वक्फ बोर्डावर ही कारवाई झालेली नसून वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या एका ट्रस्टशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ते म्हणाले.

Web Title : Nawab Malik | pune ed raids no any raid at the waqf board office says ncp minister nawab malik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !