Nawab Malik | ‘भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितकी महागाई कमी होईल’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या चढत्या किंमतीवरुन (Petrol-diesel price) विरोधकांचं लक्ष्य ठरलेलं केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) आता दर कपात केल्यामुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा (Excise duty reduction) निर्णय विरोधकांनी देशातील पोटनिवडणुकीशी (By-election) जोडला आहे. शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादीने (NCP) भाजपवर सडकून टीका केली आहे. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी निशाणा साधला आहे. भाजपला तुम्ही जितक्या वेळा पराभूत करणार, तितके पेट्रोल, डिझेलचे भाव कमी होत राहणार, ही लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा, असे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जनतेला उद्देशून म्हटले आहे.

 

देशभरात अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाले.
महाराष्ट्र (Maharashtra), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), राजस्थानसह (Rajasthan)
अनेक राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
तर निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी दरात कपात करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर निवडणूक हरल्यामुळे दरात कपात केल्याची टीका करण्यास सुरुवात केली आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना
पेट्रोलचा भाव 5 रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव 10 रुपयांनी कमी केला.
यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती.ती काही प्रमाणात कमी झाली आहे.
दरम्यान जनतेला केंद्र सरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे.
परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या ‘देशात भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरु करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले असल्याची टीका मलिक यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

 

Web Title : Nawab Malik | the more times we defeat bjp price of petrol and diesel will be reduced more says ncp leader nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | 25 वर्षीय महिलेच्या पतीमध्ये लैंगिक कमतरता ! सासर्‍यानं डायरेक्टच केलं लज्जास्पद कृत्य, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Diwali 2021 | दिवाळीत ग्रहांचा शुभयोग ! 4 राशीच्या जातकांना होईल ‘लाभ’, लक्ष्मीमातेची राहील विशेष कृपा

PM Modi | ना सुरक्षेची उपाययोजना, ना ट्रॅफिक थांबवली; दिल्लीच्या रस्त्यावर सामान्य माणसाप्रमाणे निघाले PM मोदी (व्हिडिओ)