Nawab Malik | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ला मलिक देणार ‘हायड्रोजन बॉम्ब’ने प्रत्युत्तर, उद्या सकाळी फडणवीसांच्या अंडरवर्ल्डच्या संबंधाबाबत करणार मोठा गौप्यस्फोट (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. मात्र त्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा फटका भिजलेला निघाला होता. परंतु मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब (Hydrogen bomb) फोडणार असून, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी (Underworld) असलेले संबंध उघड करणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करुन राईचा पर्वत केला.
देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. परंतु त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत.
फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता.
मात्र, त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते.
कुठला आंतरराष्ट्रीय डॉन (International Don) भारतात आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

काय म्हणाले फडणवीस?

 

कुर्ला येथे गोवावाला कंपाऊंड एलबीएस रोडवरील जमीन सलीम पटेल (Salim Patel) आणि शहा वली खान (Shah Wali Khan) यांच्याकडून मलिकांच्या कुटुंबीयांनी घेतली होती.
फराज मलिक (Faraz Malik) यांनी ही जमीन खरेदी केली होती.
या दोघांनी सॉलिडस इन्वेस्टमेंट कंपनीला (Solidus Investment Company) विकली होती.
1 कोटी महिना या दराने ही जागा भाड्याने दिली आहे. 2005 ही अवघ्या 30 लाखात जमीन खरेदी केली.
बाजारभावापेक्षा कमी दरात ही जमीन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून घेतली.
कवडीमोल दरात ही जमीन खरेदी करण्यामागे काय हेतू होता.? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

 

Web Title : Nawab Malik | underworlds hydrogen bomb be detonated tomorrow morning bjp leader devendra fadnaviss connections revealed ncp leader nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shiv Sena MP Vinayak Raut | ‘राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही’ – विनायक राऊत (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी कुर्ल्यात 3 एकर संपत्ती अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून केली खरेदी’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

Pune Crime | ‘बिल्डर’ पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे मगितली 14 कोटींची खंडणी, 3 बांधकाम व्यवसायिकांवर FIR