Nawab Malik | फ्लेचर पटेल आणि एनसीबीचा काय संबंध? 3 केसेसमध्ये एकच पंच कसा? – नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीच्या (NCB) तीन वेगवेगळ्या कारवाईत एकच साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? (Fletcher Patel) त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? असा प्रश्न नवाब मलिकांनी एनसीबीवर उपस्थित केला आहे. त्यावेळी मलिक हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबी (NCB) च्या कारवाईवर सवाल उपस्थित केले आहेत.
समीर वानखेडे (Sameer Vankhede) यांच्या पब्लिसिटी ते अनेक कार्यक्रम आयोजित करताहेत.
फ्लेचर पटेल यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे फोटो काय सांगतात? छापेमारीच्या कारवायांमध्ये कौटुंबिक मित्रालाच पंच केलं का? पंच म्हणुन जवळची लोक आहेत.
या कारवाई मग ठरवून केल्या गेल्या का? कोणते रॅकेट मुंबईत चालु आहे.
फ्लेचर पटेल लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करत आहेत? फ्लेचर पटेल (Fletcher Patel) आणि लेडी डॉनच्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीत काय सुरू आहे.
वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करतायेत. असा सवाल मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

 

त्यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, 25 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात आलेल्या कारवाईतील पंचनाम्यामध्ये फ्लेचर पटेल पंच आहे.
त्यानंतर 9 डिसेंबर 2020 रोजीच्या सर्च ऑपरेशनमध्ये फ्लेचर पटेल पंच हेच आहेत आणि 2 जानेवारी 2020 रोजीच्या छापेमारी करण्यात आली, त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत.
3 केससमध्ये फ्लेचर पटेल पंच आहेत समीर वानखेडे यांनी याचं उत्तर द्यावे असा प्रश्नही मलिकांनी केला आहे.

 

Web Title : Nawab Malik | what is relationship between fletcher patel and ncb he is person who witness in three cases of ncb nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा होती हे मान्य करा’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Gold Silver Price | धनत्रयोदशीच्या 18 दिवस अगोदर किती झाला सोन्याचा दर, ऑक्टोबरमध्ये चांदीत 3600 रुपयांपेक्षा जास्त वाढ

Ulhasnagar Crime | उल्हासनगरमध्ये ऑन डयुटी असणार्‍या पोलिसावर खुनीहल्ला ! अंमलदार रक्ताच्या थारोळयात पडल्यानं परिसरात प्रचंड खळबळ (व्हिडीओ)