Nawab Malik | ‘आता CM आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?’ BJP चा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर (Mumbai Cruise Drugs Case) महाराष्ट्रात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही आरोप केले होते. यानंतर फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. यानंतर आता भाजप (BJP) देखील आक्रमक झाला आहे.

 

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या खळबळजनक आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने (BJP) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध.
मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहेत.
आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?’ असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

 

काय म्हणाले फडणवीस?

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कागदोपत्री पुरावेही सादर केले असून ते संबंधित तपास यंत्रणांकडे देखील देणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.
तसेच, मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान 5 व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
2005 पासून 2 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच मलिक राज्यात अल्पसंख्याक मंत्री होईपर्यंत झालेल्या व्यवहारांचा यात समावेश असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Nawab Malik | will ncp minister nawab malik be expelled from the cabinet now bjps question to cm uddhav thackeray and sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Benefits of Mor Pankh | ‘मोरपंख’ प्रत्येक संकटावर रामबाण उपाय, जाणून घ्या याच्याशी संबंधीत 7 उपाय आणि सविस्तर माहिती

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई ! बनावट स्कॉच व व्हिस्की जप्त; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Multibagger Stock | 240 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार झाले मालामाल, वर्षभरात झाला मोठा नफा; 1,091 वर जाऊ शकतो शेयरचा भाव