फक्त 8 महिन्यांत बनवा नवाब शाह यांच्यासारखी बॉडी, ‘या’ 5 आहेत टिप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘टायगर जिंदा है’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘डॉन 2’ यासारख्या चित्रपटात काम करणारे नवाब शाह यांनी नुकतीच अभिनेत्री पूजा बात्रासोबत गुपचूपपणे लग्न केले.नवाबाच्या आकर्षक शरिरयष्टीचे अंक चाहते आहेत ज्यांना त्याच्यासारखी बॉडी बनवायची आहे.

येथे आम्ही व्यायामाच्या काही टिप्स देत आहोत ज्यांचे अनुकरण करून तुम्ही केवळ ६ महिन्यांकरिता व्यायामशाळेमध्ये नियमितपणे कसरत केल्यास त्याच्यासारखे शरीर तयार करू शकता. याचबरोबर तुम्हाला कठोर आहार चार्ट चे पालनही करावे लागेल आणि शरीराच्या ५ वेगवेगळ्या भागांचे व्यायाम करावे लागतील.

१. छाती (चेस्ट)
नवाब शहासारख्या रुंद छातीसाठी, आपल्याला बारबेलसह फ्लॅट बेंच प्रेस, स्टँड अपर केबल क्रॉसओवर, वन आर्म पुशअप्स, इंक्लाइन डंबेल फ्लायसारखे व्यायाम करावे लागतील.

२. पोट (एब्स)
नवाबसारख्या सिक्स पॅक अ‍ॅबसाठी तुम्हाला नियमित सायकलिंग, बॉल क्रंच, व्हर्टिकल लेग क्रंच, लॉंग आर्म क्रंच, प्लेक्स एक्सरसाइज आणि टाच क्रंच करावे हे व्यायामप्रकार करावे लागतील.

३. खांदे (शोल्डर) 
खांद्याचे व्यायाम सर्वात अवघड व्यायामप्रकारांमध्ये (हार्ड वर्कआउट्समध्ये) गणले जातात. चांगला खांदा तयार करण्यासाठी आपल्याला बारबेल प्रेस, डबल फ्रंट रेज, डंबेल लेटरल रेज यांसारखे व्यायामप्रकार करावे लागतील.

४. दंड (बाइसेप्स)
जर आपल्याला नवाबांसारखे उत्कृष्ट दंड(बाइसेप्स) मिळवायचे असतील तर आपल्याला बारबेल बायसेप्स कर्ल्स, इंकलाइन डंबेल कर्ल्स, स्टँडिंग डंबेल कर्ल्स आणि हैमर कंसर्ट्रेशन कर्ल्स यांसारखे व्यायामप्रकार करावे लागतील.

५. थाईज एक्सरसाईज (मांड्यांचा व्यायाम)
आठवड्यातून एकदा थाईज वर्कआउट्स करून आपल्या मांड्या आपण मजबूत बनवू शकता. यासाठी आपल्याला स्क्वॅट, डेडलिफ्ट, लेगप्रेस आणि लेग एक्सटेंशन सारखे व्यायाम करावे लागतील.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like