Photos : अभिनेत्री पूजा बत्रा आणि नवाबचा लग्नानंतरचा पहिला ‘हॉट’ रेड ड्रेसमधील फोटो ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूजा बत्रा आणि नवाब शाह यांनी दिल्लीत गुपचूप लग्न केलं. लग्न कंफर्म झालं आणि त्यांनी सोशलवर काही फोटो शेअर केले. या फोटोत हे दोघे सात फेरे घेताना दिसले. लग्नाच्या १४ दिवसांनंतर या कपलने आपला आणखी एक फोटो शेअर केला. हा फोटो नवाब शाहने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

lady thinks like a boss ❤️🦋🦂🎩

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

हा फोटो शेअर करताना नवाब शाहने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ” महिला बॉससारखा विचार करतात.” या फोटोत पूजा बत्रा बेडवर बसलेली दिसत आहे तर नवाब शाह तिच्यासोबत बसलेला दिसत आहे. पूजाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे तर नवाबने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोघेही एकत्र खूप छान दिसत आहे.

 

View this post on Instagram

We Did ♥️

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on

पूजा आणि नवाब यांनी ४ जुलै रोजी दिल्लीत लग्न केलं. ५ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाने लग्नात सी ग्रीन कलरची साडी घातली होती. सोबत तिने पिंक कलरची ओढणी घेतली होती. लाईट मेकअपमध्ये वधून बनलेली पूजा खूपच सुंदर दिसत होती. नवाबने पायजमा कुर्ता आणि पगडी घातली होती. फोटोत दोघेही लग्नाचे विधी करताना दिसून आले. यानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टीही दिली.

पूजाने एका मुलाखतीत बोलताना नवाबसोबत लग्न केल्याचे कबूल करत म्हटले होते की, “होय मी लग्न केलं आहे. आम्ही दिल्लीत लग्न केलं आहे. लग्नात केवळ कुटुंबातील लोक उपस्थित होते. माझे मित्र मला विचारत होते की, तुम्ही लग्नाला उशीर का करत आहात. मला हवेसोबत वाहत जायचे होते. परंतु मला वाटले की, नवाबच ती व्यक्ति आहे ज्याच्यासोबत मी माझं आयुष्य काढू शकते.”

View this post on Instagram

With My Wonder Woman 👩 My Mom

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on

View this post on Instagram

Sea Sun Sand and a scorpion ❤️🦋🦂

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

पूजा आणि नवाब सध्या गोव्यात आपलं हनीमून एन्जॉय करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like