अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी कुटुंबासह उत्तर प्रदेशात Quarantine

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी याला उत्तर प्रदेश पोलिसांनी क्वारंटाइनमध्ये पाठवले आहे. नवाझ मूळचा उत्तर प्रदेशातील बुधनाचा राहणारा आहे. ईद साजरी करण्यासाठी तो आपल्या कुटुंबासह आज त्याच्या गावी बुधनाला पोहोचला. त्याला स्थानिक पोलिसांनी क्वारंटाइनमध्ये पाठवले. आता 14 क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतरच त्याला घरी जाता येणार आहे. केंद्र सरकारने कालच खासगी गाडीने आंतरराज्य प्रवास करायला परवानगी दिली आहे.

ईद साजरी करण्यासाठी मुंबईवरून उत्तर प्रदेशात जाण्याआधी नवाझची आणि त्याच्या कुटुंबाची मुंबईत कोरोना तपासणी करण्यात आलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विविध चित्रपटांमधील अभिनयामुळे नवाझचा समावेश सध्याच्या बॉलीवूडमधील आघाडीच्या नेत्यांमध्ये केला जातो. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सेक्रेड गेम्स ही त्याची मालिकाही विशेष गाजली.