नवाजुद्दीनच्या पुतणीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता पत्नी आलियानं दिली प्रतिक्रिया, म्हणाली- ‘आणखी खूप चकित करणारे खुलासे होणं बाकी आहे’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियनं हिनं अलीकडेच तलाकसाठी त्याला नोटीस पाठवली आहे. अशातच आता त्याच्या पुतणीनं अभिनेत्याच्या भावावर आणि तिच्या काकावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सदर पीडितेनं दिल्लीच्या जामिया नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारदेखील दाखल केली आहे. हे प्रकरण तेव्हाचं आहे जेव्हा ती 9 वर्षांची होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर याची नवाज आणि त्याच्या कुटुंबाची खूप चर्चा होताना दिसत आहे. या सगळ्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे. आणखी खूप चकित करणारे खुलासे होणं बाकी असून नवाज पैशांच्या जोरावर सारं काही दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं ती म्हणाली आहे.

यासंदर्भात आलियानं ट्विट केलं आहे. आलिया म्हणते, “ही तर फक्त सुरुवात आहे. देवाचे आभार की मला एवढा सपोर्ट मिळत आहे. पुढे आणखीही बरेच खुलासे होणार आहेत जे सर्वांना चकित करतील. मी एकटीच नाहीये जी या कुटुंबात सारं काही गप्प बसून सहन करत होते. पाहूयात किती सत्य पैशाच्या जोरावर खरेदी केलं जाऊ शकतं आणि आणखी किती लोकांना ते लाच देतात.”

https://twitter.com/ASiddiqui2020/status/1267909653431640064

एका इंग्रजी वृत्तानुसार, नवाजुद्दीनच्या पुतणीनं सांगितलं की, “हे प्रकरण खूप जुनं आहे. त्यावेळी मी 9 वर्षांची होते. मी दोन वर्षांची असतानाच माझ्या पालकांचा तलाक झाला होता. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि मी माझ्या सावत्र आईसोबत राहू लागले. तेव्हा मी खूप लहान होते. मला जास्त काही समज नव्हती. माझ्यासोबत हिंसाचारही झाला आहे. मी मोठी झाले तेव्हा मला जाणीव झाली की, माझ्या अंकलनं(काकानं) माझ्यासोबत दुष्कृत्य केलं होतं. त्यांच्या प्रत्येक स्पर्श चुकीच्या इंटेनशचा होता.”

नवाजची पुतणी असं म्हणाली, “मी कोर्ट मॅरेज केलं. परंतु लग्नानंतरही मला आणि माझ्या सासरच्यांना वैताग दिला गेला. .यात माझे पप्पा आणि मोठे पप्पा (नवाजुद्दीन) सहभागी आहेत. त्यांनी माझ्या सासरच्या मंडळींवर खोट्या केस दाखल केल्या. जर त्यांनी त्यावेळी कठोरता दाखवली असती तर एवढं सगळं झालं नसतं. त्यावेळी कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आताही प्रत्येक 6 महिन्यानंतर पप्पा केस दाखल करतात. मला विश्वास आहे की आता माझ्या तक्रारीनंतरही ते काही ना काही करतील.”