Nawazuddin Siddiqui | ‘ठाकरे’ सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सज्ज; ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार

पोलीसनामा ऑनलाइन : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) हा खूपच चर्चेत आहे. नवाजुद्दीनने त्याच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. आजवर नवाजुद्दीनने विविध भूमिका उत्तमरीत्या साकारत बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थळ निर्माण केले आहे. आता नवाजुद्दीनने (Nawazuddin Siddiqui) मराठीत केलेले ट्विट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याच्या ट्विटने ‘ठाकरे 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? ही उत्सुकता लागली आहे.

नवाजुद्दीनचे हिंदी बरोबरच मराठी मध्ये देखील अनेक चाहते आहेत. त्यांनी आता मराठीत ट्विट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी ट्विट करत लिहिले की, “मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच… सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!! लवकरच अभिजित पानसे यांच्यासोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे.
जय महाराष्ट्र”. सध्या नवाजुद्दीनचे हे ट्विट सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
अनेकांनी यावर कमेंट देखील केले आहेत. जय महाराष्ट्र नवाज भाई, नव्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, जय महाराष्ट्र जय मराठी, रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला आम्ही उत्सुक आहोत अशा कमेंट्स केल्या आहेत. तर नवाजुद्दीन आणि अभिजित पानसे ही जोडी असल्याने ‘ठाकरे 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवत आहेत.

नवाजुद्दीनच्या (Nawazuddin Siddiqui) वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास त्याचा ‘कलावती’ हा चित्रपट
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी,
हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, जय दुधाणे आणि नील सालेकर हे कलाकार देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव हे करणार आहेत.
तर निर्मिती अभिजीत पानसे यांची असणार आहे. नवाजुद्दीनने आजवर ‘ठाकरे’, ‘बजरंगी भाईजान’,
‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ किक, सेक्रेड गेम्स, मांजी यासारखे हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.
सध्या नवाजुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फारच चर्चेत आहे.

Web Title :-  Nawazuddin Siddiqui | nawazuddin siddiqui new marathi movie released soon he tweeted