सुशांतच्या आत्महत्येवर बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला – ‘मलाही वाटलं होतं मरून जाईन’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. अनेकजण आता यावर भाष्य करत प्रतिक्रिया देत आहे. बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “मी स्वत:ला एका श्रमिकापेक्षा जास्त काही मानत नाही. मी इंडस्ट्रीत खूप मोठा सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन नव्हतो आलो. अशी मोठी स्वप्न पाहणं बेकार आहे कारण तुमची हाती जर निराशा लागली तर यामुळं डिप्रेशन येतं. जवळपास 10 वर्ष अशी होती मला फक्त इंडस्ट्रीत सर्वाईव करायचं होतं अनेकदा मला डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे. परंतु मी सिनेमातील एका सीनसाठीही खूप खुश व्हायचो. आपल्या प्रवासात फक्त चालत राहणं महत्त्वाचं आहे. यश आनंदाची गॅरंटी नाही देऊ शकतं. जर असं असतं तर आज सर्वात यशस्वी माणूस सर्वात जास्त खुश असला असता.

विचार केला होता मरून जाईन
नवाज पुढे म्हणतो, “माझ्याकडे जवळपास दीड वर्षे काहीच पैसे नव्हते. मी मित्रांच्या घरी जेवण करायचो. नंतर तासन् तास शहरात फिरायचो. पुरेसं जेवण न मिळाल्यानं माझं शरीर आकसलं होतं. माझे केसही गळायला लागले होते. मी सकाळी 7 वाजताच्या आसपास घर सोडायचो. तासन् तास ट्राफीक आणि इमारतींकडे टक लावून पहात विचार करायचो मी लवकरच मरून जाईन आणि नंतर हे सगळं पाहू शकणार नाही. मला वाटायचं की सगळ्यात वेगळा आहे. मी देवाचे आभार मानतो की, त्यानं मला वाचवलं. नवाजुद्दीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच तो घूमकेतू सिनेमात दिसला होता. झी 5 वर हा सिनेमा स्ट्रीम करण्यात आला होता. या सिनेमात त्याच्या सोबत डायरेक्टर अ‍ॅक्टर अनुराग कश्यपनंही काम केलं होतं. या सिनेमाला ठिकठाक प्रतिसाद होता.