प्रसिद्ध लेखक ‘मंटो’च्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीन फी म्हणून घेतला होता फक्त 1 रुपया ! जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो (Saadat Hasan Manto) यांना जाऊन दीर्घकाळ लोटला आहे. परंतु त्यांच्या लिखानाला भारावलेली लोकं आजही आहेत. मंटोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) च्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. परंतु तुम्हाला माहित आहे का, या चॅलेंजिंग रोलसाठी नवाजनं फक्त एक रुपया फी घेतली होती. मंटोंनी 18 जानेवारी 1955 रोजी जगाचा निरोप घेतला होता. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आजज आपण या निमित्तानं काही किस्से जाणून घेणार आहोत. सिनेमाशी संबंधित काही विशेष माहितीही वाचणार आहोत.

2018 साली रायटर मंटोवर सिनेमा तयार करण्यात आला होता. नंदिता दास (Nandita Das) यांनी मंटोला ट्रिब्युट म्हणून हा सिनेमा तयार केला होता. नवाजुद्दीननं या सिनेमात मंटोची भूमिका साकारली होती. खूप विचार विनिमय केल्यानंतर नवाजनं या सिनेमासाठी होकार दिला होता. त्याला ही खात्री करायची होती की, तो ऑनस्क्रीन मंटोलच्या रोलला न्याय देऊ शकतो की नाही. परंतु नवाजनंही करून दाखवलं. देशातच नाही तर जगभर त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

फी म्हणून घेतला होता फक्त 1 रुपया
नंदिता दास यांन जेव्हा नवाजला स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा त्याला जाणवं की, जे विचार मंटोचे आहेत तसेच त्याचेही आहेत. एकमेकांचे काही विचार जुळत आहे. त्यामुळं आपल्याप्रति इमानदार होत त्यानं सिनेमात काम करण्यासाठी फक्त एक रुपया फी म्हणून घेतला. पत्रकार परिषदेत त्यानं याबाबत सांगितलं होतं. त्यानं सांगितलं होतं की, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याशी जुडलेली असते, त्या गोष्टीसोबत तुम्हाला खास लगाव वाटतो तेव्हा पैशांची गोष्ट करणं हा अप्रामाणिकपणा आहे. म्हणून त्यानं फी म्हणून एक रुपया घेतला होता.

त्यांच्या काळातील सर्वात कॉंट्रोव्हर्सियल रायटर होते मंटो
लेखक सआदत हसन मंटो त्यांच्या काळातील सर्वात वादग्रस्त रायटर्सपैकी एक आहे. त्यांनी अशा अनेक मद्द्यांवर भर दिला ज्यावर समाजाची कमी नजर जाते, आणि त्यांच्या हक्कांसाठी खूप कमी लोक आवाज उठवत असतात. त्यांनी महिलांच्या हक्कावर भाष्य केलं. ते त्या वेश्यांचा आवाज बनले ज्यांचं ऐकणारं कुणी नव्हतं. त्यांच्या लिखाणात जी सहानुभूती दिसते त्यासोबत येणारी पिढी सहमत राहिली आणि सआदत हसन मंटो हे नव्या पिढीच्या आवडत्या रायटरपैक एक बनले. 11 मे 1912 रोजी मंटो यांचा जन्म झाला होता. पार्टिशन नंतर ते पाकिस्तानात गेले. 18 जानेवारी 1955 रोजी त्यांचं निधन झालं.