मला प्रसूतीच्या कळा होत होत्या अन् नवाजचं गर्लफ्रेंडसोबत सुरू होतं ‘गुलूगुलू’, पत्नी आलियाचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी सतत चर्चेत आहे. आलियाने नवाजला इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्यानंतर आलिया प्रकाशझोतात आली असून तिने नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले आहेत. मी गरोदर असताना नवाज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असायचा असा आरोप पत्नीने केला आहे.

नवाजुद्दीन आणि मी 2003 पासून एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. या काळात नवाजचा भाऊसुद्धा आमच्यासोबत राहत होता. आम्ही तिघांनी मिळून एका चित्रपटावर एकत्र कामही केले होते. याच काळात मी आणि नवाज प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर सुरुवातीला आमच्या अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. परंतु, कालांतराने या समस्या दूर होतील असे मला वाटले होते. मात्र, लग्नाला 15-16 वर्ष झाले तरीदेखील माझा मानसिक त्रास कमी झाला नाही. आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि लग्नाचाही विचार करत होतो. त्याचवेळी नवाज अन्य एका महिलेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे हे मला सतत जाणवत होते. या मुद्द्यावरुन अनेक वेळा लग्नापूर्वी आमच्यात वादही झाले होते. लग्नानंतर मी प्रेग्नंट होते त्यावेळी देखील प्रत्येक टेस्ट करण्यासाठी मी एकटीच रुग्णालयात जायचे. डिलिव्हरीच्या वेळेसदेखील मी एकटीच गेले होते. हे पाहून तू वेडी आहेस का? असे माझी डॉक्टर कायम मला म्हणायची. जेव्हा मला प्रसूतीकळा सुरु झाल्या तेव्हा नवाज आणि त्याचे आई-वडील तिथे होते. पण जेव्हा मला खूप त्रास होत होता तेव्हा माझा नवरा माझ्यासोबत नव्हता. तो त्याच्या प्रेयसीसोबत फोनवर बोलण्यात व्यग्र होता. यामुळे मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.