नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’ आणि ‘फसवणूक’ केल्याचा आरोप, दाखल केली तक्रार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, त्याच्या पत्नीने अभिनेत्याविरोधात बलात्कार आणि फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. तिने ही तक्रार वर्सोवा पोलिस ठाण्यात दिली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने जुलै महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यासह तिने अभिनेत्याबरोबरच्या तिच्या दु:खी जीवनाबद्दलही अनेक वक्तव्ये केली होती.

वकील म्हणाले, “माझ्या क्लायंटने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 375, 376 (के), 376 (एन), 420 आणि 493 नुसार तक्रार दाखल केली आहेत. आम्हाला आशा आहे की लवकरच या प्रकरणातील एफआयआर देखील नोंदविला जाईल.”

नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल पत्नीने विधान केले आहे
महत्त्वाचे म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी म्हणाली, “मी 2003 पासून नवाजुद्दीनला ओळखत आहे. आम्ही एकत्र राहायचो. त्याचा भाऊही पुन्हा आमच्याबरोबर राहायला लागला. तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि मग आमचं लग्न झालं. आमच्या मध्ये सुरुवातीपासूनच समस्या सुरु होत्या. मला वाटले की हे थांबेल पण त्याला 15-16 वर्षे झाली आहेत आणि मेंटल टॉर्चर थांबलेला नाही.”

ती पुढे म्हणाली की, मला हे चांगले आठवते की जेव्हा आम्ही डेटिंग करत होतो आणि लग्न करणार होतो तेव्हाच त्याचे आधीपासूनच दुसऱ्या कोणाशी अनैतिक संबंध होते. लग्नाच्या आधी आणि नंतरही आम्ही खूप झगडायचो. मी जेव्हा गर्भवती होते तेव्हा मी स्वत: गाडी चालवत असे आणि डॉक्टरकडे तपासणीसाठी जात असे. माझे डॉक्टर मला सांगायचे की मी प्रसुतीसाठी एकटी आलेली पहिली महिला आहेत. मला प्रसूतीची वेदना झाली तेव्हा नवाज माझ्याबरोबर नव्हता. तो आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होता. मला हे सर्व माहित आहे कारण फोन बिलावर एक स्टेटमेंट असायचे.

याखेरीज नवाजचा भाऊ शमास यांनी मला फोन बिलचं बिल दिले होते, असेही ती म्हणाली. त्यांनीच मला नवाजबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या पहिल्या प्रसूतीनंतरही नवाजच्या मनात काहीच भावना नव्हती. मी नवाजला कधीही सांगितले नाही की त्याच्या भावाने मला सर्व काही सांगितले आहे, परंतु मी ठरवले होते की आता मी त्याच्यासोबत राहणार नाही.