येत्या ३-४ वर्षात नक्षलवाद्यांचा सुपडासाफ करू : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या १२६ जिल्ह्यामंमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ ७-८ जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे. येत्या ३ ते ४ वर्षांमध्ये भारतातून नक्षलवाद्यांचा बिमोड करू. असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका सभेत सुरक्षा हा देशाच्या विकासामधील आवश्यक भाग आहे आणि त्याच्या मार्गात येणारे दहशतवादी यांना चिरडून टाकण्यात येईल. देशाच्या १२६ जिल्ह्यामंमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ ७-८ जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे. आणि येत्या ३ ते ४ वर्षांमध्ये भारतातून नक्षलवाद्यांचा बिमोड करू असे आश्वासन मी तुम्हाला देतो. तसेच झारखंडमधील नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे, राज्यात काही ठिकाणी असलेले त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात आणले जाईल. असे राजनाथ सिंह यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, काँग्रेसने आणि झारखंड मुक्ती मोर्चाने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, मात्र त्यांचे उद्दिष्ट सफल होणार नाही. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, याआधी झालेल्या एका सभेत, १९७१ ला दिवंगत इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही ? असा सवाल त्यांनी केला होता. इतकेच नव्हे तर विरोधी किती दहशतवादी ठार झाले हे विचारत आहे. मात्र शूरवीर मृतदेह मोजत बसतात का ? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे आहे असा ही टोला त्यांनी लगावला होता.