पुणे परिसरात संशयित नक्षलवादी ताब्यात, जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील चाकण परिसरामध्ये झारखंड पोलिसांनी एका संशयित नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित नक्षलवाद्याने सहा वर्षापूर्वी पोलिसांवर हल्ला करून पसार झाला होता. या घटनेत झारखंडमधील पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

साहेब राम हांसदा उर्फ आकाश मुर्मू (रा. लखनपूर, जि. दुमका, झारखंड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित नक्षलवाद्याचे नाव आहे. 2013 मध्ये झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला होता. यामध्ये पाकुर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरजीत बलहार यांच्यासह सहा पोलीस कर्मच्यांऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आकाश मुर्मू फरार झाला होता. या हल्ल्यामध्ये त्याचा हात असल्याची माहिती झारखंड पोलिसांना मिळाली होती. झारखंड पोलीस घटनेनंतर त्याच्या मागावर होते. मागील काही दिवसांपासून तो चाकण परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती झारखंड पोलिसांना मिळाली होती.

झारखंड पोलिसांच्या एका पथकाने चाकण परिसरात त्याचा माग काढून ताब्यात घेतले. आकाश मूर्म याला चाकण परिसरातून ताब्यात घेऊन झारखंड पोलीस झारखंडला रवाना झाले आहेत. मुर्म याची चौकशी सुरू असून त्याचे बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like