7 ‘जहाल’ माओवाद्यांचे आत्मसमर्पण ! 33 लाखाचे बक्षीस होतं त्यांच्यावर

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – माओवादी चळवळीच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे ‘चातगाव दलम’च्या सर्व माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दलाचा कमांडर राकेश आचला यांच्यासह उपकमांडर देवीदास आचला आणि इतर सर्व माओवाद्यांनी माओवाद सोडून आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पणात 3 महिलांच्या देखील समावेश आहे. दलाचा कमांडर राकेश आचला यांच्यावर 30 तर उपकमांडर देवीदास आचलावर 9 गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर 33 लाखाचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते.

सिंदेसूर आणि गोवीन या दोन चकमकीनंतर दलमच्या सदस्यांना आत्मविश्वास डगमगल्याने आत्मसमर्पण केले. दलम धानोरा आणि एटापल्ली या तालुक्यातील सीमावर्ती भागात सक्रीय आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या या माओवाद्यामध्ये राकेश उर्फ गणेश सनकू आचला (वय-34), देविदास उर्फ मनिराम सोनू आचला (वय-25), शिवा विज्या पोटावी (वय-22), आणि राहुल उर्फ दामजी सोमजी पल्ले (वय-25), रेश्मा उर्फ जाई दुलसु कोवाची (वय-19), अखिला उर्फ राधे झुरे (वय-27) , करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (वय-22) यांचा समावेश आहे.

33 लाख 50 हजार बक्षीस असलेल्या चातगाव दलमच्या 7 माओवाद्यांना गडचिरोली पोलीस अधीक्षक शैलेश बलकावडे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांनी कबुली दिली की काम करताना महिलांवर अत्याचार करत असत आणि दलममधील माओवादी अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेत त्यांना जबदस्तीने दलात भरती करत असत. यावेळी या सर्वांना हिंसाचार सोडून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचे या आत्मसमर्पन केलेल्या माओवाद्यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजना, वर्षभरात झालेल्या चकमकी, माओवाद्यांचा झालेला खात्म याशिवाय हिंसाचाराला कंटाळून या माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Visit : Policenama.com