मतदान केंद्राजवळ आयईडी स्फोट ; परिसरात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आज २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. असे असताना छत्तीसगड येथील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात देखील आज मतदान आहे. अशातच छत्तीसगड मधल्या नारायणपूर येथे नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळते आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसून ही घटना फरसगांव ठाणे क्षेत्रात घटना घडली आहे. या घटनेला येथील एसपीने दुजोरा दिला आहे. या स्फोटानंतर या भागातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. हा स्फोट नारायणपूर जिल्ह्यातील मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट घडवण्यात आला. नक्षलवाद्यांकडून हे कृत्य केवळ दहशत पसरवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ied-blast

या घटनेनंतर देखील आज सकाळी सात वाजल्यापासून येथे शांततेत मतदान सुरु झाले आहे. या भागाचे एसपी मोहित गर्ग यांनी सांगितले की, मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यानी स्फोट केला आणि ते पसार झाले. या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

बिहारच्या औरंगाबाद संसदीय क्षेत्रातील सिलियामध्ये बूथ नंबर ९ च्या जवळ आयईडी विस्फोटक सापडले. गयाचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या ठिकाणी बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे.