नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळली

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन- नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुसे येथे चार ट्रॅक्टर जाळल्याची घटना काल मध्येरात्रीच्या सुमारास घडली. लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार नक्षलवांद्याकडून करण्यात आला आहे. दहशत माजवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलीस प्रशासनाला नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलीसांची तैनात करावी लागणार आहे.

एटापल्ली तालुक्यातील पुसे येथे रस्त्याचे काम चालु असून, त्यासाठी चार ट्रॅक्टर आणण्यात आले होते. ह्या चारही ट्रॅक्टरांना नक्षलवाद्यांनी आग लावली. त्यात ती पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. यात सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ह्या आगोदर देखील नक्षलवाद्यांनी जानेवारी महिण्यात कोरची, कुरखेडा या गावातील अनेक वाहने जाळली होती. लोकसभा निवडणुका जाहीर होताच हा प्रकार दुसऱ्या दिवशी घडला,त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करुण ती पसरविण्याचा घाट या नक्षलवाद्यांनी घातल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे निवडणुकींच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात अशा घटना घडणार नाहीत. याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

न्यायालयाजवळ गोळीबार प्रकरण : रावण गॅंगचे दोघे गजाआड

अहमदनगर : प्रदीप टाक खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

वीस रुपयांचे नवे नाणे चलनात

निवडणुकीची आचारसंहिता धाब्यावर ; रेल्वेच्या हद्दीत लावले बॅनर्स

काँग्रेसचा हवाई मार्ग भाजपने रोखला ; ६०% हेलिकॉप्टर्स केले बुक