नक्षलवाद्यांनी शेअर केला बेपत्ता जवानाचा फोटो, सुटकेसाठी ठेवली अनोखी ‘अट’

पोलीसनामा ऑनलाइन -देशाला हादरवून सोडणा-या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 22 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ कोब्रा कमांडोचा जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो शेअर करण्यात आला आहे. राकेश्वरचा फोटो शेअर करताना तो सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. फोटोत राकेश्वर ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. सीआरपीएफने त्याच्या चित्राबाबत दुजोरा दिला आहे. राकेश्वर यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी सुटकेनंतर तो सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावे अशी अट घातली आहे. नक्षलवाद्यांच्या या भूमिकेमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावे, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली आहे. नक्षलवाद्यांनी राकेश्वरच्या सुटकेसाठी अशी अट ठेवल्याने खळबळ माजली आहे.