24 लाखाचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ‘नयनतारा गुप्ता’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मेफेड्रॉन’ आणि ‘एलएसडी’ स्टॅम्प असं 24 लाखाचं अंमली पदार्थ
बाळगणाऱ्या महिलेला सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात अटक केली आहे.
नयनतारा गुप्ता (वय २८, रा. लुशलाईफ स्कायहाईट, उंड्री पिसोळी) असे या महिलेचे नाव आहे.
सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक महिला अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी NIBM रोडवरील ‘क्लोव्हर हायलँड’ जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरुन पोलिसांनी खातरजमा केलं. पोलिसांनी नयनतारा गुप्ता या महिलेला संशयावरुन ताब्यात घेतले आणि तिची झडती घेतली असता तिच्याकडे 54 ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ हा अंमली पदार्थ तसेच 416 ‘एलएसडी’ स्टॅम्प आढळलं.

शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर एलएसडी स्टॅम्प पकडण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ आहे.
ग्राहकांना विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याची कबुली नयनतारा गुप्ता हिने दिली असून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंमली पदार्थ बाळगणारा नायजेरियन जाळ्यात
अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 लाख 16 हजार रुपयांचे 52 ग्रॅम कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला अटक केली आहे़ डेव्हिड फॉन्सिस (रा. खारघर, मुंबई) असं त्याचे नाव आहे. पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील ‘ओ’ हॉटेलजवळ बुधवारी डेव्हिड याला संशयावरुन ताब्यात घेतलं. त्याच्याकडे 4 लाख 16 हजार रुपयांचे 52 ग्रॅम कोकेन आढळून आले.

Visit : Policenama.com