Nayanthara | अभिनेत्री नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव ; म्हणाली “मला मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात…”

पोलीसनामा ऑनलाइन : साउथ सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या खूपच चर्चेत आहे. नयनतारा चर्चेत असण्यामागचे कारण म्हणजे ती लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नयनताराचे अनेक चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नयनताराचा (Nayanthara) हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट असणार आहे. एका मुलाखती दरम्यान इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल एक धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

नयनताराने इंडस्ट्रीमध्ये तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता हे तिने मुलाखतीमध्ये सांगितले. त्या कास्टिंग काऊचचा सामना तिने कशा पद्धतीने केला याबद्दल सांगताना तिने एक घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी बोलताना नयनतारा म्हणाली की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला कास्टिंग काऊचच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. एका चित्रपटात मला मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात माझ्याकडे निर्मात्यांनी काही मागण्या केल्या होत्या. अर्थातच मी त्या मागण्या धुडकावून लावल्या आणि त्या भूमिकेलाही नकार दिला”. यादरम्यान अभिनेत्रीने मात्र त्या चित्रपटाचे आणि निर्मात्याच्या नावाचा खुलासा केला नाही.

या मुलाखतीमध्ये नयनताराने (Nayanthara) पती आणि निर्माता विघ्नेश शिवनचाही उल्लेख केला आहे.
यावेळी बोलतात ती म्हणाली, “मला तर आता कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत नाही.
कोण माझ्याविषयी वाईट बोलत असेल किंवा टीका करत असेल तरीदेखील या अशा वाईट परिस्थितीत माझा
पती नेहमीच माझ्याच बरोबर असतो. त्यामुळे मला सर्व काही ठीक आहे असं वाटतं”.
नयनताराच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती डिसेंबर 2022 मध्ये ‘कनेक्ट’ या चित्रपटात झळकली होती.
तर आता ती लवकरच ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title :- Nayanthara | nayantara open up about her shocking casting couch experience

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanita Kharat Wedding | वनिताच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Jalna Crime News | नशेच्या भरात पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; जालन्यामधील घटना