Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेत्री आणि ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी नयनतारा (Nayanthara) ही तिच्या अप्रतिम अभिनयासोबतच तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. पण सध्या नयनतारा मोठ्या पडद्यापासून लांब राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं नुकताच समोर आलय. 2015 मध्ये नयनतारा आणि विग्नेश शिवण यांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. नयनताराने (Nayanthara) प्रियकर विग्नेश शिवन यांच्याशी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर चार महिन्यांनीच या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

त्यामुळे तिला भरपूर ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. उयीर आणि उलगम अशी तिच्या जुळ्या मुलांची नावं आहेत. पण आता तिच्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि मुलांची देखभाल करण्यासाठी तिने करिअरमधून एक्सिट घेतल्याचं समोर आलं आहे. अभिनयातून जरी तिने ब्रेक घेतला असला तरी ती पतीच्या म्हणजेच दिग्दर्शक विग्नेश शिवण यांच्या ‘रावडी पिक्चर्स’ या प्रॉडक्शन हाऊसकडे लक्ष देणार असल्याचं कळतंय. मात्र नयनताराच्या या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत. असं असलं तरी नयनताराचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तिचे काही पूर्ण केलेले आणि शूटिंग झालेले चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नयनताराच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट ‘लेडी सुपरस्टार 75’ आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कृष्णा हे आहेत. यानंतर नयनताराकडे (Nayanthara) अल्फोन्स पुथरेनचा ‘पटू’
हा चित्रपट आहे. यामध्ये ती फहाद फाजीलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
याशिवाय ती अजित कुमार यांच्या ‘AK62’ चित्रपटातही दिसणार आहे. याचे दिग्दर्शन विग्नेश शिवण करत आहेत.
याशिवाय नयनतारानं पुरी जगन्नाथ यांचा ‘ऑटो जानी’ हा चित्रपटही साइन केला आहे.
नयनताराचा प्रतीक्षेत असलेला सर्वांत मोठा चित्रपट म्हणजे ‘जवान’.
यामध्ये ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. अटली हे या चित्रपटाचं दिग्दर्शक आहेत.
हा चित्रपट याचवर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :-Nayanthara | nayanthara is quiting acting and going to be housewife know the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी