नायगाव ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील चालू वर्षी होऊ घातलेल्या श्री क्षेत्र नायगाव ग्रामपंचायतीची वार्डनिहाय आरक्षण सोडत खेळीमेळीच्या वातावरणात जाहीर झाली.

सभेसाठी मंडलाधिकारी भिसे, तलाठी विश्वास अटोळे, ग्रामसेवक विठ्ठल धायगुडे, उपसरपंच किशोर खळदकर, सदस्य चंद्रकांत चौंडकर, अनिल शेंडगे, मंगल मेमाणे, मारूत्ती पाटोळे, प्रकाश कड, विलास खेसे, संतोष गायकवाड, संजय होले, महेश कड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शासनाच्या निकषानुसार आरक्षण संदर्भात चर्चा झाली.

२०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण असल्याचे मंडलाधिकारी भिसे यांनी सांगितले. त्यानुसार गावचे वॉर्डनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे –
वॉर्ड क्रमांक एक : १ सर्वसाधारण महिला आणि २ सर्वसाधारण पुरुष.
वॉर्ड क्रमांक दोन : १ नागरिकांचा मागासवर्ग, १ अनुसूचित जाती महिला, १ सर्वसाधारण महिला.
वॉर्ड क्रमांक तीन : १ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, १ सर्वसाधारण महिला, १ सर्वसाधारण पुरुष.