नायगाव येथे पौष पौर्णिमा उत्सहात संपन्न

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे पौष पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. अशोक महाराज कामठे (वारकरी रत्न,पुरंदर) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांना मृदुंग साथ तेजस खेसे, यशवंत भोसले यांनी दिली. गायन साथ ह.भ.प. आबा बोरकर, चांगण महाराज, भोसले महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव ग्रामस्थ भजनी मंडळाने दिली.

श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी मनोज जगताप यांनी केली. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद झाला. अशी माहिती ह.भ.प. रामकाका कड व बाळासाहेब कड यांनी दिली. पोपट होले, नामदेव होले (उंड्री), भानुदास मोरे (पुणे), गंगाराम चौधरी (खोर), मल्हारी लवांड, (हिंगणीगाडा), राजेंद्र कड (नायगाव), बाळकृष्ण कड (राहूरी), लिलावती जगताप (सासवड), दशरथ शेंडकर(चांबळी) यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट, पाणी, दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती, असे राहुल कड यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/