नायगाव येथे होळी पोर्णिमा उत्सहात संपन्न

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे होळी पोर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले. होळी पोर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान आलून अभिषेक करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.सुनिल महाराज झांबरे(बीड) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून विविध उदाहरणे देऊन भाविकांना मंञमुग्ध केले. मृदुंगाची साथ तेजेस खेसे व आबा बोरकर यांनी दिली. गायन साथ चांगण महाराज, कोलते महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली. त्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आरती करून महाप्रसाद देण्यात आला. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी दिपक जगताप यांनी बांधली. अन्नदान अशोक खेसे, बाळासो खेसे, रामदास खेसे, हनुमंत खेसे, हनुमंत गो. खेसे (नायगाव), रामदास यादव (माळशिरस), छबन बोराटे (नांदूर) यांच्या वतीने करण्यात आल्याचे ह.भ.प शांताराम कड व मनोज जगताप यांनी सांगितले. मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट, पाणी, दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती, असे ट्रस्टचे सचिव राहुल कड व ह.भ.प संतोष गायकवाड यांनी सांगितले.

Loading...
You might also like