पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये मोनालिसाचा ‘रोमँटीक’ अंदाज ! फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी सेंसेशन मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. अलीकडेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे नेहमीप्रमाणे चर्चेत येताना दिसत आहेत. मोनानं पती विक्रांत सिंहसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसानं अलीकडेच तिच्या इंस्टावरन काही फोटो शेअर केले आहेत. सध्या ती श्रीलंकेत व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. काही फोटो तिनं तिच्या इंस्टा स्टोरीवरूनही शेअर केले आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, मोनालिसा आपल्या पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहे. मोनालिसा खूप आनंदी आणि खुश दिसत आहे. आपल्या पती सोबत मोनालिसाची रोमँटीक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सध्य मोनालिसाचे हे रोमँटीक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोत दिसतंय मोनानं एक हॉट असा स्विम सूट घातला आहे. तिला हा स्विमसूट चांगला दिसत आहे. यात मोनालिसा खूपच बोल्ड दिसत आहे. मोनालिसाचा पती विक्रांतही शर्टलेस आहे. दोघांचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 ॲक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. मोनालिसानं 47 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली.