12 वी पास उमेदवारांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे सर्वत्र नोक-यावर संक्रात आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 12 वी पास तरुणांसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डात NBE नोकरीची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने ज्युनिअर, सिनिअर असिस्टंट आणि ज्युनिअर अकाउंटंट या पदासाठी अर्ज मागवले आहेत. एनबीईकडून NBE या संदर्भात नोटिफिकेशन जारी केले असून 42 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना बोर्डाच्या natboard.edu.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरु होणार असून 14 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

शैक्षणिक पात्रता
1) ज्युनिअर असिस्टंट – या पदासाठी उमेदवार हा 12 वी पास असावा. तसेच संगणकाबद्दल माहिती असावी. (विंडोज, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम, लॅप आर्किटेक्चर) याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

2) सिनिअर असिस्टंट – कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवीधर पदवी

3) ज्युनिअर अकाउंटंट – गणित आणि स्टॅटिस्टिक्स सोबत ग्रॅज्युएशनची डिग्री तसेच एनबीईने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कॉमर्समध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष अन् जास्तीत जास्त वय 27 वर्ष असले पाहिजे. एससी, एसटी गटातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची आणि ओबीसी गटातील उमेदवाराला 3 वर्षांची सवलत देण्यात येईल. तसेच सामान्य आणि ओबीसी उमेदवारासाठी 1500 रुपये शुल्क राहील. तर एससी, एसटी, दिव्यांग, महिला आदीना काहीही शुल्क आकारले जाणार नाही.

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या NBE भरतीसाठी कम्प्यूटर बेस्ड टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा दोन होणार आहे. परीक्षेत 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी 180 मिनिटे म्हणजेच 3 तासांचा वेळ दिला जाणार आहे. यासह निगेटिव्ह मार्किंग होईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

रिक्त पदांचा तपशील
ज्युनिअर असिस्टंट- 30

सिनिअर असिस्टंट- 08

ज्युनिअर अकाउंटंट- 04

महत्वपूर्ण तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2021

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2021

सीबीटी परीक्षा – 20 सप्टेंबर 2021