पुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले का ?

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरसचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. पुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले का ? असे वक्तव्य केले आहे.

कश्मीरच्या एका प्रचार सभेत बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, ‘छत्तीसगडमध्येही आपले जवान शहीद झाले, तिथे मोदी गेले का ? शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ते भेटले का ? पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यावरही मला संशय आहे.’

लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी झाली आहे. काँग्रेस जम्मू आणि उधमपूरमधून लढणार आहे. तर श्रीनगर लोकसभा मतदार संघातून नॅशनल कॉन्फरन्स लढणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला स्वतः श्रीनगरमधून उभे आहेत.

पुलवामा हल्ल्यासंबंधी अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य –
यापूर्वीही अब्दुल्ला यांनी पुलवामा हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केले होते. जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले होते. या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी या दहशदवादी हल्यात फक्त पाकिस्तान जबाबदार नाही असे विधान केले होते.

निवडणुकांसाठीच एअर स्ट्राइक –
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईविषयीही अब्दुल्ला यांनी शंका व्यक्त होती. निवडणुका जवळ आल्यामुळेच बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्याचा गंभीर आरोप जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी केला होता.