NCB ची धडक कारवाई ! 3 दिवसात 6 आरोपींना अटक, अमली पदार्थ जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या तीन दिवसात मुंबई शहर आणि उपनगरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( Narcotics Control Bureau) धडक कारवाई करत अंमली पदार्थ विक्रीचे रँकेट उध्द्वस्त करून विविध ठिकाणाहून 6 जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

एनसीबीने सोमवारी एलएसडीचे 20 ब्लॉटस व 95 ग्रँम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी केल्विन मेंडेस्वासला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी केलेल्या तपासात नील डिसिल्व्हा व अहमद शेख या आणखी दोन आरोपीना बुधवारी अटक केली. त्यानंतर एनसीबीने सुनील गवई या आरोपीकडून 1.250 किलो गांजा जप्त केला आहे. त्याला वांद्रे न्यायालयाजवळील नाक्यावर बुधवारी मध्यरात्री अटक केले. तसेच मुंबई सेंट्रल येथील नाथानी हाईटस या इमारतीजवळ कारवाई करुन 10 ब्लॉटस एलएसडी व 32.9 ग्रँम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी नवाब शेख व फारुक चौधरी या दोन आरोपींना अटक केल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक वानखेडे यांनी दिली.