अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह अटक ! ड्रग्ज प्रकरणातील पहिला परदेशी आरोपी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी ड्रग्जप्रकरणी प्रथमच परदेशी व्यक्तीला अटक (arrest )करण्यात आली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह अटक (arrest )केली. जिसिलाऊस डेमेट्रिऍडेट्‌स असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ही कारवाई केली आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्स वितरकाच्या संपर्कात डेमेट्रिऍडेट्‌स असल्याचा संशय होता. सुशांतसिंहप्रकरणी अटक झालेल्या अनेक बड्या वितरकांकडून तो ड्रग्स विकत घेत होता.

डेमेट्रिऍडेट्‌स ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज केशवानी व ड्‌वेन यांच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे. तो या प्रकरणातील आरोपी कैझानलाही ओळखत होता. त्याने हशीश व आईसचा पुरवठा केला होता. त्यानंतर याप्रकरणी त्याचा जबाब नोंदवून डेमेट्रिऍडेट्‌सला अटक करण्यात आली.

एनसीबीने लोणावळा येथे डेमेट्रिऍडेट्‌स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. त्या ठिकाणी तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून ०.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. शनिवारी त्याच्या खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. त्या ठिकाणी अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली आहे. डेमेट्रिऍडेट्‌स हा या प्रकरणातील पहिला परदेशी आरोपी आहे. सुशांतसिंहप्रकरणी अटक झालेल्या अनेक बड्या वितरकांकडून तो ड्रग्स विकत घेत होता.

You might also like