सुशांत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची अ‍ॅक्शन जारी, झाली 22 वी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फिल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटकसत्र सुरूच आहे. आता एनसीबीने प्रतिबंधित अमली पदार्थाचे सेवन आणि वितरणाच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक केली आहे.

एनसीबीच्या अधिकार्‍यांनी केस नंबर 16/20 मध्ये गुरुवारी सायंकाळी सांताक्रूज येथे राहणारा जय मधोक यास अटक केली. हे तेच प्रकरण आहे, ज्यामध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य 19 लोकांना एजन्सीने अटक केली आहे. जय मधोकच्या सोबतच एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात 22 लोकांना अटक केली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी म्हटले की, मधोक ड्रग्जचे सेवन करण्यासह याच्या वितरणात सुद्धा सहभागी आहे. यावरून समजते की तो एक ड्रग्ज पॅडलर सुद्धा आहे. मधोक एक पॅडलर आहे आणि कोकीनसह हॅशचा सुद्धा वितरक आहे. त्याचे नाव इतरही अनेक आरोपींनी घेतले आहे.

22 लोकांना अटक
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत एकुण 22 लोकांना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतचा मॅनेजर सॅमुअल मिरांडा, दीपेश सावंत सुद्धा सहभागी आहेत. याशिवाय ड्रग पॅडलर जैद, बासित परिहार आणि इतरांना सुद्धा अटक केली होती.

तर ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टने जामीन दिला, परंतु तिचा भाऊ शौविकची जामीन याचिक ड्रग पॅडलर्ससोबत प्रत्यक्ष संबंध असल्याचे सांगत फेटाळली होती. मधोकला क्षितिज प्रसादवर आरोप करण्यासाठी ओळखले जाते, ज्याने प्रथम धर्मा प्रॉडक्शनसाठी काम केले होते.

You might also like