NCB ची मोठी कारवाई ! मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला अटक, 2 कोटीचे ड्रग्ज जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.25) रात्री मुंबईतील लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड आदी ठिकाणी छापेमारी केली. कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला एनसीबीने अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच महागड्या गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत.

Advt.

शादाब बटाटा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. एनसीबी गेल्या काही दिवसांपासून शादाबच्या मागावर होती. मात्र गुरुवारी रात्री केलेल्या छापेमारीत एनसीबीला मोठ यश मिळाले आहे. एनसीबीने त्याच्याकडून पैसे मोजण्याची मशीनही जप्त केली आहे. शादाब बटाटा मागील बऱ्याच काळापासून ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करतो. मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनाही तो ड्रग्ज पुरवठा करत होता. मुंबईमध्ये एमडीशिवाय परदेशातून येणाऱ्या एलएसजी, गांजा, कोकीन ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा फारुख बटाटा करतो. मुंबईतील प्रत्येक बार आणि मोठ्या ड्रग्ज पार्टीमध्ये तोच ड्रग्ज पुरवतो. फारुख सुरुवातीला बटाट्याची विक्री करायचा. याचवेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि आज तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार बनला आहे. आता ड्रग्जच्या दुनियेच संपूर्ण काम त्याची दोन मुले सांभाळतात, अशातच आता शादाबला अटक झाली आहे.