NCB Drugs Raid | NCB नं ताब्यात घेतलेल्या शाहरूख खानच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर; आर्यनचा जबाब नोंदवला (व्हिडिओ)

0
78
NCB Drugs Raid | ncb drugs raid shah rukh khan son aryan questioned first inside video come out, ncb record statement of aryan khan
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCB Drugs Raid | मुंबई लगतच्या सुमुद्रात एका मोठ्या क्रुझवर सुरु असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB Drugs Raid) शनिवारी रात्री छापा टाकला. यामध्ये बड्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये बॉलूवड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन (Aryan Khan) खान याच्यासह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुंबईहून गोव्याकडे (GOA) जाणाऱ्या लक्झरी क्रूझ (Luxury cruise) Cordelia मध्ये जाऊन एनसीबीने सीक्रेट ऑपरेशन केले. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एनसीबीनं केलेल्या या कारवाईत (NCB Drugs Raid) मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रवासी म्हणून या क्रूझमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी क्रूझवर सुरु असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ताब्यात घेतले असून त्याचा Inside Video समोर आला आहे.

मला गेस्ट म्हणून बोलावले – आर्यन
एनसीबीने हाय प्रोफाईनल ड्रग्स पार्टीवर कारवाई केल्यानंतर 8 जणांना ताब्यात घेतले. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन यालाही ताब्यात घेतले असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र, आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

NCB ने आर्यनचा जबाब नोंदवला

NCB च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रूझवर ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
आर्यन खाननं चौकशीत सांगितले की, त्याला या क्रूझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आलेलं नाही.
केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं.

विविध प्रकारचे ड्रग्स जप्त
या कारवाईनंतर एनसीबीने अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे,
एनसीबी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.2) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला.
या ऑपरेशन दरम्यान MDMA/एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा (FIR) 9/21 अंतर्गत दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.

Web Title :- NCB Drugs Raid | ncb drugs raid shah rukh khan son aryan questioned first inside video come out, ncb record statement of aryan khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या नराधमाकडून भर रस्त्यात 17 वर्षाच्या मुलीशी अश्लील भाषा अन् ‘विनयभंग’

Japanese Towel Exercise | 5 मिनिटांची ‘जपानी टॉवेल एक्सरसाईज’ केल्याने होतील फ्लॅट अ‍ॅब्ज, 10 दिवसात चमत्कार !

Power Crisis In India | देशात वीजेच्या संकटाचा धोका ! 72 थर्मल पावर प्लांटमधील कोळसा संपला, जाणून घ्या कारण