सुशांत केस : NCB ने फाईल केले 30 हजार पानांचे चार्जशीट, रिया चक्रवर्ती-शौविक मुख्य आरोपी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने शुक्रवारी मुंबईच्या एनडीपीएस कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे. 30 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे जबाब सुद्धा जोडले आहेत. पाच आरोपी फरार सांगण्यात आले आहेत, तर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती मुख्य आरोपी आहेत.

याशिवाय रियाचे निकटवर्तीय आणि अनेक ड्रग्ज पॅडलर सप्लायरचे नाव सुद्धा चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून सहभागी आहे. ड्रग्ज जप्ती, जप्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट, साक्षीदारांचे जबाब या आधारावर हे चार्जशीट तयार करण्यात आले आहे.

एनएसबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चार्जशीट कोर्टात घेऊन आले. एनएसबी सूत्रांनुसार, या मुख्य चार्जशीटच्या तीन महिन्यानंतर एनसीबी एक सप्लीमेंट्री चार्जशीट सुद्धा कोर्टात दाखल करणार आहे. ज्यामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूरचे नाव असू शकते. त्यांच्याविरूद्ध सुद्धा एनएसबीला अनेक पुरावे मिळाले होते, ज्यांचा तपास अजूनही जारी आहे. हे चार्जशीट 16/2020 कम्पलेंट केस प्रकरणात दाखल होत आहे.

मागच्या वर्षी जूनमध्ये झाले होते सुशांतचे निधन
मागच्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत, मुंबईतील बांद्रायेथील फ्लॅटमध्ये मृत आढळला होता. सुरुवातीला या प्रकरणाला केवळ आत्महत्याच मानले गेले. मात्र, सुशांतच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात सीबीआय सुद्धा सहभागी झाली. इतकेच नव्हे, माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी विशेष तपासासाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत पाठवली होती.

या प्रकरणात ड्रग्जचा अँगल आल्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींपर्यंत एनसीबी पोहचली होती. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेक लोकांना जेल झाली. या प्रकरणात ज्या ड्रग पॅडलर्सचे नाव आले होते, त्यांच्यापैकी अनेकजण अजूनही कारागृहात आहेत.