अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तकाला NCB ने ठोकल्या बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीने कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवी मुंबईतील घणसोली येथून त्याला अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर ड्रग्ज तस्कारांनी मोठा धसका घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी मुंबईत मोठ्या कारवाया करत आहे. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली आहे. घणसोली येथून त्याला अटक केली आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक असून नातेवाईकही आहे. महत्वाचे म्हणजे तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे.