मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCB | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा एनसीबीच्या (NCB) कारवाईवर निशाणा साधला आहे. आपल्या जावयाला (son in law) विनाकारण ड्रग्स प्रकरणात गोवलं गेल्याचा दावाही यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. माझा जावई समीर खान (Sameer Khan) ड्रग्स पेडलर (Drugs peddler) असल्याचे सांगत बातम्या पेरण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी केला.
नवाब मलिक (Sameer Khan) यांचा जावई ड्रग्स पेडलर असल्याचं भाजप नेते (BJP leader) म्हणतात. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एनसीबीने (NCB) मलिकांचे जावई समीर खान ड्रग्स पेडलर असल्याचे सांगून बातम्या पेरण्यात आल्या. या प्रकरणात जावयला अडकवण्यात आलं. जावई साडे आठ महिने कारागृहात होता. कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 14, 2021
एनसीबीला गांजा आणि तंबाखू मधला फरक कळत नाही
एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाई दरम्यान 200 किलो गांजा सापडला असं सांगण्यात आलं होतं.
पण गांजा सापडलाच नाही तर हर्बल तंबाखू असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याच्या खोट्या बातम्या आहेत.
एनसीबीला गांजा आणि तंबाखू यामधला फरक ओळखता येत नाही? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) प्रकरणातही एनसीबीनं सजलानींसह अनेकांना विनाकारण गोवलं आहे, असेही मलिक यांनी म्हटले.
BJP-Shivsena Alliance | ‘… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असते’, शिवसेनेच्या या दिग्गज मंत्र्याचं वक्तव्य
समीर खानला कसे अडकवले
समीर खान यांना एनसीबीनं कसं अडकवलं याचा घटनाक्रम नवाब मलिक यांनी सांगितला. समीर खान यांना ज्या प्रकरणात गोवण्यात आले ते प्रकरण प्रत्यक्षात शाहिस्ता फर्निचरवाला (Shahista Furniturewala) हिच्याशी संबंधित होतं.
तिच्याकडून एनसीबीनं साडेसात ग्रॅम गांजा जप्त केला होता.
या कारवाईनंतर मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), नोएडा (Noida), गुरगाव (Gurgaon) अशा विविध ठिकाणी एकामागोमाग एक छापे टाकण्यात आले. माझ्या मुलीच्या घरी देखील छापा टाकला.
सगळ्या कारवाईत 200 किलो गांजा जप्त करण्यात आला असं एनसीबीनं सांगितलं.
मिडियाच्या माध्यमातून या बातम्या पसरवण्यात आल्या. प्रत्यक्षात हे प्रकरण केवळ साडेसात ग्रॅम गांजाचं होतं.
हा गांजा जिच्याकडून पकडण्यात आला, तिला सोडण्यात आलं.
परंतु माझा जावई समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सजलानी (Karan Sajlani) यांना अडकवण्यात आल्याचे मलिकांनी सांगितले.
या प्रकरणात गडबड
जप्त केलेल्या गांजाचे व कारवाईचे फोटो एनसबीच्या एका अधिकाऱ्याच्या मोबाइलवरुन पत्रकारांना पाठवण्यात आले होते तो मोबाईल नंबरही (9820111409) मलिक यांनी माध्यमांना दिला.
जप्तीची प्रक्रिया चुकीची असल्याचं कोर्टात सिद्ध झालं. कुठलही गोष्ट जप्त केल्यानंतर ती तिथल्या तिथं सील केली जाते. मात्र, माध्यमांना पाठवण्यात आलेले फोटो हे एनसीबीच्या कार्यालयातील होते, असा मुद्दा आम्ही कोर्टात उचलला.
त्यावर एनसीबीकडं उत्तर नव्हतं.
मीडियानं हे फोटो काढले असावेत, असं सांगण्यात आलं.
त्यातून या प्रकरणात गडबड असल्याचं समोर आलं, असंही मलिकांनी सांगितले.
Udayanraje Bhosale | उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’
Pizza मिळाला नाही म्हणून 18 वर्षाच्या मुलीनं दिला जीव, वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर निघाली अंत्ययात्रा