ताज्या बातम्यामुंबई

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  NCB Officer Sameer Wankhede | मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून (Cruise Drugs Party Case) अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने प्रतिज्ञापत्रावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) हे आगोदरच अडचणीच्या कचाट्यात सापडले आहेत. यानंतर आता समीर वानखेडे यांच्याविरुद्ध अ‍ॅड. सुधा द्विवेदी (Adv. Sudha Dwivedi) यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) याच्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली समीर वानखेडे आणि इतर व्यक्तींवर गुन्हा (FIR) दाखल केला जावा. अशी मागणी करण्यात आलीय.

 

समीर वानखेडे विरोधात अ‍ॅड. सुधा द्विवेदी यांनी मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस स्टेशन (MRA Marg Police Station) आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे
(Addl CP Milind Bharamba) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) याबाबत तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत म्हटलं आहे की, आर्यन खान (Aryan Khan) याला सोडण्यासाठी
अभिनेता शाहरुख खान याच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे व अन्य 5 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करून याची चौकशी करण्यात यावी, या तक्रारीत किरण गोसावी,
सॅम डिसुझा आणि प्रभाकर साईल यांची नावे असून या सर्वांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा (NCB Officer Sameer Wankhede) दाखल व्हावा.
असं त्या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, तक्रार प्राप्त झाली असली तरी याबाबत अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेले नाही, असं या अधिका-याने सांगितलं आहे.

दरम्यान, ही कारवाईच बोगस असल्याचा दावा करत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत.
त्यातच या प्रकरणात एक पंच साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने रविवारी प्रतिज्ञापत्र जारी करत खळबळ उडवून दिली.
आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटींची खंडणी मागण्यात आली. यातील आठ कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते.
असा दावा साईल याने केला. या आरोपाची गंभीर दखल घेत एनसीबीने वानखेडे यांची चौकशी सुरू केली.

 

Web Title : NCB Officer Sameer Wankhede | advocate sudha dwivedi lodges complaint against ncbs sameer wankhede 5 others for extortion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Shivendra Raje Bhosale | आमदार शिवेंद्रराजे यांचा टोला; म्हणाले – ‘साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे’ (व्हिडीओ)

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट ! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार ‘हे’ 3 भत्ते, जाणून घ्या किती मिळेल पगार

Parambir Singh | परमबीर सिंग यांना ‘फरार’ घोषित करण्याची शक्यता; पगार थांबवला 

Back to top button