×
Homeक्राईम स्टोरीNCB Officer Sameer Wankhede | वारंवारच्या आरोपांविरोधात NCB अधिकारी समीर वानखेडेंची कोर्टात...

NCB Officer Sameer Wankhede | वारंवारच्या आरोपांविरोधात NCB अधिकारी समीर वानखेडेंची कोर्टात धाव; एनसीबीचाही अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  NCB officer Sameer Wankhede | आर्यन खान अटक (aryan Khan Arrest) प्रकरणाला आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. एकीकडे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे फरार आरोपी किरण गोसावी (Kiran Gosawi) याचा अंगरक्षक प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला. साईल याचा आरोप करतानाचा व्हिडिओ काल सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापल्यालं पाहायला मिळालं.

 

या सर्व आरोपांच्या पार्श्वभुमीवर आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे  यांनी न्यायालयात (court) धाव घेतली आहे.
समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोर्टाबाहेर होत असलेले आरोप, उघड केली जात असलेली पंच,
साक्षीदारांची नावं यास वानखेडे यांनी हरकत घेतली आहे.
घडलेला गुन्हा आणि त्याविषयीच्या पुराव्यांबाबत न्यायालयाबाहेर सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
त्यामुळे तपास आणि खटल्यावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा प्रतिज्ञापत्रात व्यक्त केलीय.

 

समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, ‘तपासात खोडा घालण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत.
समीर खान नामक एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून एक राजकीय नेता मला सातत्यानं लक्ष्य करत आहे.
माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. न्यायालयानं याची दखल घ्यावी,’ अशी विनंती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

दरम्यान, यानंतर एनसीबीकडूनही (NCB) अर्ज दाखल करण्यात आला आहे. ‘प्रभाकर साईल याच्या कथित प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टाला पूर्वग्रहयुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे प्रतिज्ञापत्र कोर्टात अधिकृतरित्या सादर न करता माध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केले. यातून कुहेतू स्पष्ट होतो. यामागे हितसंबंध गुंतलेले लोक आहेत.
शिवाय समीर वानखेडे यांना व्यक्तिशः लक्ष्य केले जात असून तपासावर परिणाम व्हावा हा उद्देश त्यामागे आहे.
त्यामुळं त्या कथित प्रतिज्ञापत्राची कोणत्याही न्यायालयात दखल घेतली जाऊ नये या दृष्टीनं आदेश द्यावेत’, अशी विनंती एनसीबीकडून (NCB) करण्यात आली आहे.

 

 

Web Title :  NCB Officer Sameer Wankhede | mumbai drug case ncb officer sameer wankhede files affidavit in special court after prabhakar sail allegations today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

NCB Officer Sameer Wankhede | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा, म्हणाले – ‘माझे वडील हिंदू, तर आई…’

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील’ 

Must Read
Related News