NCB Officer Sameer Wankhede | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंना दुहेरी धक्का? 2 दिवसांत महत्त्वाचा आदेश निघणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  NCB Officer Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा (Mumbai Drugs Party Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून पर्दाफाश करण्यात आला. यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर वारवांर गंभीर आरोप करत आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. समीर वानखेडे हे आज दिल्लीत (Delhi) एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झालेत. तेथे वरिष्ठांची भेट घेत आहेत. तर, समीर वानखेडे तात्काळ दिल्लीत पोहचल्यानं अनेक चर्चा रंगल्या आहेत.

 

आपल्याला कोणतंही समन्स बजावण्यात आलेलं नाही, असं समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
तसेच मलिक यांनी सातत्यानं वानखेडेंवर आरोप केलेत. याच कारणामुळे समीर वानखेडे यांची बदली मुंबईबाहेर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच याबाबत आदेश 2 दिवसांत निघू शकतात, असं एका वृत्तानुसार समजते.

एनसीबीच्या (NCB) मुख्यालयात पोहचते वेळी माध्यमांनी गर्दी केल्याने समीर वानखेडे हे मागील दाराने विभागात दाखल झालेत.
तसेच, त्यांच्यावर झालेल्या आरोपांची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आलीय. वानखेडे यांची खातेअंतर्गत चौकशी होणार आहे.
चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याला त्या पदावर राहता येत नाही असा नियम आहे.
म्हणून ही प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत समीर वानखेडे यांना दूर केले जाणार, याबाबत आदेश दोन दिवसात निघण्याची शक्यता आहे.
तसेच, मुंबई विभागाच्या संचालक पदावरून दूर करतानाच वानखेडेंकडून क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपासही काढून घेतला जाऊ शकतो.
याबाबतचा निर्णय एनसीबीचे प्रमुख (Head of NCB) घेतील. त्यामुळे वानखेडेंना दुहेरी झटके मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title : NCB Officer Sameer Wankhede | mumbai drugs cruise party case ncb officer sameer wankhede might be transferred soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police Crime Branch | दुकानांमधील किमती सिगरेटची पाकीटे चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाची विजयी सलामी; द गेमचेंजर्स संघाचा तिसरा विजय!

MSRTC | एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर