NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCB officer Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत हल्लाबोलही केला आहे. तसेच त्यांनी ट्विटरवर एक क्राॅप फोटोसहीत जन्मदाखल्याचा फोटो देखील ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. यानंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिलं आहे. हा फोटो समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचंही सांगण्यात येतं आहे. मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होत आहे. तर, आता समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मलिक यांनी टि्वट केलेल्या जन्मदाखल्याच्या फोटोेवरुन समीर वानखेडे यांनी मलिक यांना उत्तर दिलं आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले, आपल्या बाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत.
आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा.
आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे,
अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. तसेच, आपल्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे.
याला आपण कायदेशीर उत्तर देऊ. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- NCB officer Sameer Wankhede | over birth certificate row NCB Officer sameer wankhede slam ncp minister nawab malik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2021 | PAK विरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Multibagger Stocks | 4.45 रूपयांचा हा शेयर झाला 998 रुपयांचा, एक वर्षात दिला 22,300% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 2.24 कोटी

Pune Crime | ‘या’ कारणामुळं झाली वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’, गोळ्या झाडून केला ‘खात्मा’

Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)