NCB Raid | जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ ! शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय झालंय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCB Raid | मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया या जहाजावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB Raid) शनिवारी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. यावेळी 20 हुन अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींचा समावेश असुन त्यातील काही नामवंत उद्योगपतीच्या मुलींचा समावेश आहे. तर एक बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचाही यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. हे क्रूझ मुंबईहून गोव्याला जाणार होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने  80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली असल्याचेही समोर आले आहे. तर एनसीबीने या प्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनसीबीचे मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री झालेल्या मुंबई किनारपट्टीवरील रेव्ह पार्टी संदर्भात आर्यन खानची चौकशी सुरु आहे. त्याच्यावर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला नाही. किंवा अटकही करण्यात आली नाही. त्यांचा फोन जप्त केला असून फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. केवळ त्याचाच नाही तर क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत. याशिवाय ही पार्टी आयोजित करणाऱ्या सहा आयोजकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

जहाजावर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची ठोस माहिती मिळाल्याने मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे
आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते.
मुंबईतून हे जहाज निघाले. समुद्राच्या मध्यभागी हे जहाज पोहोचताच रेव्ह पार्टी सुरु झाली.
त्यानंतर एनसीबीने कारवाई केली. तब्बल सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना (NCB Raid) एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस सापडले.
ते सर्व जप्त केले आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह 10 लोकांना ताब्यात घेत सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

Web Title :- NCB Raid | ncb interrogates shah rukh khan son aryan khan in mumbai rave party case ncb detain more than 20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Raid | एनसीबीचा समुद्रातील क्रुजवर सुरू झालेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा; IPS अधिकारी ताब्यात?

Pune News | महात्माजींना स्मरून लोकशाही, संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Diseases that are hard to diagnose | डॉक्टरांना देखील होत नाही ‘या’ 7 आजारांचं सहजपणे ‘निदान’, जाणून घ्या