‘राणेंच्या भाषणांची NCB ने चौकशी करावी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्याने आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण म्हणजे निर्बुद्ध शिवराळ बरळण असे होते, अशी टीका राणेंनी केली. तसेच कोरोनाच्या काळात घरात बसून काम करत आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की वाघ आहे. पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे, असा टोला देखील राणे यांनी लगावला होता. राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. राणे यांच्या भाषणाची एनसीबीने (investigate-narayan-ranes-speech-today) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (shiv-sena-leader-arjun–khotkar) यांनी मांडली आहे.

नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवावे. राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांचे मुले कुणाचीही लायकी काढणं, खाली पाडून बोलणे यामध्ये धन्यता मानतात, असे खोतकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. मुख्यमंत्र्यांना शेलक्या भाषेत, एकेरी बोलले. हे महाराष्ट्राच्या जनतेला न आवडणारे आहे. तुम्ही चुका असतील तर योग्य पद्धतीने मांडा. चुका लक्षात आणून द्या. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर अशाप्रकारे भाषण केले आहे, याची एनसीबीने चौकशी करावी.

काय म्हणाले नारायण राणे

मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदे दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिले होते, असे राणे यांनी सांगितले. राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर मातोश्री च्या आतल आणि बाहेरचे सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर असल्याचे ते म्हणाले.

बेडके कितीही फुगले तरी वाघ होत नाहीत

नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला ठाकरे यांनी मेळाव्यात तितक्याच सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

You might also like