सुशांत केस : रियाच्या घरी पोहचली NCBची टीम, ड्रग्ज चॅटच्या खुलाशानंतर सर्च !

मुंबई : ड्रग्ज चॅट प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) टीमने छापेमारी केली आहे. सॅम्युअल मिरांडाच्या घरीसुद्धा एनसीबीच्या टीमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

रिया आणि तिचा भाऊ शौविकमध्ये ड्रग्जबाबत होत असलेल्या चर्चेचा खुलासा झाला होता. एनसीबीची टीम ड्रग्ज अँगलचा तपास करण्यासाठी रियाच्या घरी सर्च ऑपरेशन करत आहे. एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर (ऑपरेशन) सुद्धा टीमसोबत रियाच्या घरी पोहचले आहेत. एनसीबीच्या टीमने ड्रग्ज पॅडलरला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला ड्रग्ज पॅडलर जैदने शौविक आणि सॅम्युअल मिरांडाचे नाव घेतले आहे.

आजतक या वृत्तवाहिनीला रिया आणि तिचा भाऊ शौविकमधील मार्च 2020 चे व्हॉट्सअप चॅट मिळाले होते. यामध्ये रिया एका व्यक्तीसोबत चॅट करत आहे की, तो दिवसात 4 वेळा ड्रग्ज भरून सिगारेट पितो. या चॅटमध्ये रिया थेट आपल्या भावाकडे ड्रग्जची मागणी करताना दिसत आहे. रिया ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे म्हणत असली तरी तिचे आणखी एक ड्रग्ज चॅट समोर आले आहे. ज्यामध्ये ती भाऊ शौविककडे ड्रग्ज मागत आहे.

एनसीबीने या प्रकरणात 2 ड्रग्ज पॅडलरला अटक केली आहे, ज्या लोकांनी रियाचा भाऊ शौविकच्या नावाचा खुलासा केला होता. सोबतच एनसीबीला शौविक अनेक ड्रग्ज पॅडलरच्या संपर्कात असल्याचे पुराव मिळाला आहेत. यापूर्वी सुशांत केसमध्ये सीबीआयने रियाच्या वडीलांची सुमारे साडेपाच तास चौकशी केली होती. सुशांत केसमध्ये ईडीकडून सुद्धा चौकशी सुरू आहे.