NCERT Committee | ‘इंडिया’चा धसका : सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी ‘भारत’ लिहिण्याची एनसीईआरटी समितीची शिफारस

मुंबई : NCERT Committee | विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन करून एनडीएविरूद्ध आव्हान उभे केल्यानंतर इंडिया नावाचा वापर करताना मोदी सरकारला (Modi Govt) अनेक अडचणी वाटू लागल्या आहेत. याबाबत अनेक सूचना काढाव्या लागत आहेत. जी५ परिषदेच्या निमंत्रणावर इंडियाऐवजी भारत (Bharat) लिहिण्यात आले होते. आता एनसीईआरटी (NCERT Committe) समितीने सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये (School Textbook) इंडियाच्या जागी भारत लिहिण्याची शिफारस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एनसीईआरटी समितीने सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ठिकाणी भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे. या बदलानंतर आता विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत हा शब्द दिसणार आहे. एनसीईआरटी समितीने सर्व एनसीईआरटी (NCERT Committee) पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.

समितीच्या एका सदस्याने माहिती दिली की, एनसीईआरटी पुस्तकांच्या पुढील संचामध्ये इंडिया हे नाव बदलून भारत
केले जाईल. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता, तो आता मान्य केला आहे.
समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘हिंदू विजय‘ ठळक करण्याची शिफारसही केली आहे.

समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘प्राचीन इतिहास’च्या जागी ‘शास्त्रीय इतिहास’ समाविष्ट करण्याची शिफारस केली.
इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही,
कारण भारत हे एक जुने राष्ट्र आहे आणि ब्रिटिश साम्राज्यवादाबद्दल अनभिज्ञ आहे, असे म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तळेगाव दाभाडे परिसरातील घटना

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणावर भाजपा मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया, पण…