NCL Recruitment 2021 | 8 वी अन् 10 वी पास तरुणांसाठी NCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 1500 हजार जागांसाठी भरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – NCL Recruitment 2021  | नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता 8 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेडने (Northern Coalfields Limited) अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केल आहे. त्यानुसार तब्बल 1500 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. एनसीएलच्या अधिकृत वेबसाईट nclcil.in वर जाऊन तुम्हाल ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जाची प्रक्रिया 10 जूनपासून सुरु झाली असून 9 जुलै 2021 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

1) या पदासाठी भरती
एकूण जागा :
1500
वेल्डर : 100
फिटर : 800
इलेक्ट्रीशियन : 500
मोटर मेकॅनिक : 100

यात ओपनसाठी 762 जागा आहेत, तर ओबीसींसाठी 225, अनुसूचित जातीसाठी 213, अनुसूचित जनजातीसाठी 300 पदं आहेत. तसंच पीडब्ल्यूडीच्या (PWD) श्रेणीत येणाऱ्यांसाठी 60 जागा आहेत.

2) शैक्षणिक पात्रता
वेल्डर पदासाठी तुम्ही अर्ज करणार असाल, तर 8 वी पास अन् आयटीआय (ITI) असणे अनिवार्य आहे. इलेक्ट्रेशियन पदासाठी 10 वी पास अन् आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच फिटर पदासाठी 10 वी पास आणि आयटीआय अनिवार्य आहे. मोटर मेकॅनिक पदासाठी 10 पास तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

3) वयोमर्यादा
अप्रेंटीस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 वर्षापेक्षा जास्त अन् 24 वर्षापेक्षा कमी असावे. आरक्षित जागांसाठी मात्र वयाची मर्यादा त्या त्या नियमानुसार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेचा आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी होईल, कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच नियुक्ती होणार आहे.

Web Titel :- NCL recruitment 2021 | ncl release notification for job vacancies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक